चिपळूण न.प. आरोग्य विभागातील स्वच्छतादुतांकरिता आरोग्य तपासणी शिबीर

चिपळूण (प्रतिनिधी) : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने व काम फाउंडेशन यांच्या विद्यमाने दि. ९ ते ११ जून या कालावधीमध्ये चिपळूण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम फाउंडेशनच्या संचालिका डॉ. स्मिता सिंग, प्रशासकीय अधिकारी, मंगेश पेढामकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, शहर अभियंता दीपक निंबाळकर, सोहम पाटील, अग्निशमन अधिकारी आनंद बामणे मान फाउंडेशन प्रतिनिधी प्रसन्न येवलेकर व श्याम राठोड यांच्या उपस्थितीमध्ये चिपळूण नगर परिषद आरोग्य विभागातील सर्व स्वच्छता दुत यांचे करिता पायाभूत स्वच्छता प्रशिक्षण व मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते.
सदर शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, टी. टी. इंजेक्शन इत्यादी सेवा देणेत आले. सदर शिबीर करिता मुकादम दीपक किंजळकर, मधुकर मोहिते, दीपक जाधव, रोहन सकपाळ, संकेत मोहिते, रोहन सकपाळ, सागर सावंत, अनिल खापरे, राजेंद्र नवरत, शशिकांत चांदिवडे, मनीष जाधव, तुषार जाधव व श्रीमती श्वेता किल्लेकर आदिनी मेहनत घेतली.