रत्नागिरी /दापोली : प्रतिनिधी
आज अहमदाबाद वरून लंडनला जाणाऱ्या विमानाचा उड्डाणा नंतर काही मिनीटांतच अपघात झाला. यात विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स मृत्युमुखी पडले. या दुर्दैवी आणि भीषण अपघातात रत्नागिरी जिल्ह्याने दोन लेकी गमावल्या आहेत.
या अपघातात चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुपुत्रवधू आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक (वय ३५) यांचा मृत्यू झाला आहे. अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत. गेल्या काही वर्षांपासून त्या एअर इंडिया सेवेत कार्यरत होत्या. गुरुवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना, तांत्रिक बिघाडामुळे विमान अपघात घडला आणि या दुर्घटनेत अपर्णा यांना प्राण गमवावे लागले. त्यांचे पती अमोल महाडिक हेही एअर इंडिया सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या अपघाती मृत्यने धामेली गावावर शोककळा पसरली आहे.
तर याच विमानात एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत असलेली मंडणगड तालुक्यातील बुरी येथिल युवती कुमारी रोशनी राजेंद्र सोनघरे हिचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.