रत्नागिरी | प्रतिनिधी
तालुक्यातील आरे वारे समुद्रात शनिवारी दोघेजण बुडाले पैकी एकाला वाचवण्यात यश आले. दोघेही पनवेल येथील होते. त्यातील सिद्धार्थ विनायक फासे ( वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर प्रविंद्र बिरादार यांना वाचिवण्यात स्थानिकांसह जिवरक्षकांना यश आले आहे. शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.
रत्नागिरीच्या कोषागार कार्यालयात काही वर्षांपुर्वी कार्यरत असलेले व सध्या वसई-विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक विनायक फासे हे दि.१५ ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी रत्नागिरीत आले होते. शनिवारी दुपारी ते कुटुंबासमवेत आरे -वारे येथील समुद्र किनारी गेले होते.कुटुंब किनार्यावरती फिरत असतानाच त्यांच्या मुलगा सिद्धार्थ हा गुडघाभर पाण्यात उतरला.
अशातच अचानक आलेल्या एका लाटेमुUे सिद्धार्थ पाण्यात ओढला गेले. प्रविंद्र बिरादार यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात धाव घेतली. त्याला जवळ ओढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सिद्धार्थ आता ओढला जात होता. सिद्धार्थला विचविताना प्रविंद्र बिरादार यांच्या श्वास गुदमरु लागल्याने ते पाण्यात कोसUले.
याच कालावधित नातेवाईकांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांसह जिवरक्षक घटनास्थUी धावले. त्यांनी सर्व प्रथम प्रविंद्र बिरादार यांना पाण्याच्या बाहेर काढले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र पाण्याच्या प्रवाहात आत ओढला गेलेल्या सिद्धार्थचा मृत्यू झाला. त्याला जिवरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तो मृत असल्याचे वैद्यकिय अधिकार्यांनी घोषित केले.
या घटनेचे वृत समजताच पोलीस निरिक्षक नितिन ढेरे, पोलीस उपनिरिक्षक सौ.सावंत,सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय शिगवण यांनी घटनास्थUी धाव घेतली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात येऊन पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मृत तरुणा हा वसई-विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक विनायक फासे यांचा मुलगा आहे. विनायक फासे हे रत्नागिरीत सुद्धा काही वर्षे कार्यरत होते












