रत्नागिरी : युवा सेनेच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये 70% हून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रविवार दिनांक 15 जून रोजी सकाळी दहा वाजता माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सत्कार करण्यात येणार आहे.
राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. रत्नागिरी शहर व रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील 70 टक्के हून अधिक गुण मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन युवा सेनेचे तालुकाप्रमुख तुषार साळवी आणि शहर प्रमुख अभिजीत दुडये यांनी केले आहे.












