गौरव पोंक्षे l माखजन : महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये अनेक समस्या आहेत.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत समस्यांचा पाढाच वाचला.
यावेळी त्यानी शाळांमध्ये पूर्ण वेळ शिपाई भरण्यात यावा अशी आग्रही मागणी केली.शिपायांना देत असलेल्या १५ हजार रुपये मानधनात लक्षणीय वाढ करण्यात यावी असे सांगितले.
शिवाय अनेक प्राथमिक शाळांमध्ये हजार हुन अधिक पतसंख्या आहे .त्याठिकाणी पूर्वी प्रमाणे क्लर्क मिळणार का असा प्रश्न विचारला.शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २८ जानेवारी २०१९ ला जो आकृती बंध आला त्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत अशी मागणी केली.अनेक ठिकाणी वरिष्ठ लिपिक विद्यार्थी संख्येच्या सुधारित नियमात अतिरिक्त ठरत आहेत.अनेक वरिष्ठ लिपिक हे वयाची ५५ वर्षे उलटून गेलेले आहेत.ह्या स्थितीत त्यांना अतिरिक्त ठरवणं योग्य नाही.अशा वरिष्ठ लिपिकाना त्याच ठिकाणी सेवा संरक्षण द्यावे अशी मागणी केली.
याला उत्तर देताना शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी हे विषय रास्त आहेत.संबंधित आमदारांसोबत बैठक घेऊन याबाबतीत काय निर्णय घेता येईल ते ठरवू असे सांगितले.












