चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टी झाली होती. यात अनेक घरे तसेच गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबतचा महसूल विभागाने पडलेल्या घरांचा व गोठ्यांचा पंचनामा केला. मात्र एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असून आर्थिक मदत मिळत नसल्याने आपदग्रस्त कुटुंब नाराजी व्यक्त करत आहेत.
चिपळूण तालुक्यात गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे काही घरे जमीनदोस्त झाली. त्यामुळे सदर कुटुंबियांवार उघड्यावर राहण्याची वेळी आली. महसूल विभागाने पडलेल्या घरांचा पंचनामा केला. मात्र, आर्थिक मदत मिळत नसल्याने सदर कुटूंबियावर संकट कोसळले. दरम्यान या सर्व प्रकाराची माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे, तलाठी आणि उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने लोकप्रतिनिधिनी दखल घेऊन त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.












