इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या हिंदी बालभारती पहिली इयत्तेच्या पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण (वार्ताहर) : इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता १ ली च्या हिंदी बालभारती पुस्तकाचे पुणे येथे बालभारती मध्ये प्रकाशन महाराष्ट राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
यावेळी बालभारतीच्या हिंदी भाषा आधिकारी श्रीमती अलका पोतदार, हिंदी संघटनेच्या वृंदा कुलकर्णी, विजयकुमार जोशी हिंदीचे तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते. इयत्ता पहिली मराठी माध्यमाच्या शाळांना हिंदी पुस्तक, हिंदी भाषा सुरु करण्याची मागणी अनिलकुमार जोशी यानी केली आहे.