देवगड (प्रतिनिधी)
रात्रौच्या वेळी घरात झोपलेल्या ९० वर्षीय महिलेच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची (रु १लाख)किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेलेल्या संशयित आरोपी रत्नाकर शांताराम मांजरेकर याला देवगड पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली व अवघ्या काही तासातच संशयित आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले व त्याने चोरलेला मुद्देमाल हस्तंगत करण्यातही देवगड पोलिसांना यश असून यातील संशयित आरोपीला देवगड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसाची मॅजेस्टिक कस्टडी ठोठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड किल्ला येथील फिर्यादी अमोल गणपत वाडेकर यांच्या घरात ९० वर्षीय आत्ये शारदा चिंतामण मुणगेकर ही रहात असून त्यांच्या घरी त्यांचा नातेवाईक रत्नाकर शांताराम मांजरेकर (रा. वैभववाडी सध्या देवगड किल्ला)हा गेली १० ते ११ महिने रहात आहे .फिर्यादीची आत्ये ही रात्री झोपलेली असताना तिच्या हातातील बांगडी चोरीस गेल्याची फिर्याद अमोल वाडेकर यांनी देवगड पोलिसात दिली सदरची घटना ८ जून रात्री ९ ते ९जून दु.१२.३० च्या दरम्यान घडली.असल्याची फिर्याद देवगड पोलिसात दाखल होताच देवगड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व या घटनेतील संशयित आरोपी चे लोकेशन तपासले असता ते वेंगुर्ला येथे दिसून आले तात्काळ देवगड पोलिस पथकाने वेंगुर्ला येथे जाऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतले .
आरोपी गुन्हा कबूल करीत नाही असे दिसताच पोलिसांनी सखोल तपास करताच आरोपीने गुन्ह्याची कबूल देत ती बांगडी वैभववाडी येथे विकल्याचे सांगितले वैभववाडी येथून देवगड पोलिसांनी तो मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीला देवगड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसाची मॅजेस्टिक कस्टडी ठोठावली आहे.
सहा. पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे,सहा. पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव,पोलीस हवालदार आशिष कदम,योगेश लगड,पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर,निलेश पाटील यांनी या तपास पथकात सहभाग घेतला.












