राजापुरात दीड लाखांच्या गोवा बनावटीच्या मद्यासह एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

 

राजापूर । प्रतिनिधी :

राजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाला दिनांक 25/06/2025 रोजी रात्री 01.00 ते पहाटे 05.00 वाजण्याच्या मुदतीत ऑल आऊट ऑपरेशन नाकाबंदी दरम्याने एक काळ्या रंगाची स्कार्पियो वाहन क्रमांक MH-05-FB-4152 हे अवैधरित्या गोवा बनावटचे मद्य वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
प्राप्त माहितीच्या आधारे राजापूर पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव पथक यांनी एस.टी डेपो, राजापूर समोर नाकाबंदी करून वरील नमूद वाहन ताब्यात घेतले व या वाहनावरील चलकाची व वाहनाची अधिक तपासणी केली असता त्यामध्ये ₹1,57,920/- किमतीचे गोवा बनावटीचे मद्य मिळून आले. या वाहनावरील चालक चेतक भरत वाळवे, वय 29, रा. तिवरेडांबरे वाळवेवाडी ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग यास ताब्यात घेण्यात आले आहे तसेच यातील 5,00,000/- किमतीची काळया रंगाची स्कार्पियो वाहन क्रमांक MH-05-FB-4152 ही देखील ताब्यात घेण्यात आलेली आहे.

या कारवाई मध्ये एकूण ₹ 6,57,920/- किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आलेला आहे तेच चालक चेतक भरत वाळवे, वय 29, रा. तिवरेडांबरे वाळवेवाडी ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग याच्या विरुद्ध राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही, कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक अमित यादव व खालील नमूद पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
1) पो.उ.नि. श्री. मोबीन शेख,
2) सपोफौ/608 श्री. करजवकर,
3) म. पोहवा/1311 श्रीमती. चव्हाण,
4) पोकॉ/990 श्री. रेडेकर व
5) पोकॉ/1625 श्री. वारीक.