भरणेत महाराजस्व अभियान

खेड(प्रतिनिधी)भरणे येथे तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानास भरणे मंडलातील शेतकरी खातेदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. प्राथमिक स्वरुपात शेतकऱ्यांना दाखलेही वितरीत करण्यात आले.

 

उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, पी. एम. किसान योजना, सातबारा वितरण, खाते उतारा वितरण, वारसा फेरफार वितरण, प्रतिज्ञापत्र वितरण दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी उपस्थित शेतकरी खातेदारांना मार्गदर्शन केले. मंडल अधिकारी उमाकांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कृषी सहाय्यक आचलखांब यांनी सूत्रसंचालन, तर ग्राम महसूल अधिकारी विशाल चौगले यांनी आभार मानले.