कॅथॉलिकच्या सालईवाडा येथील नवीन शाखेचा १८ रोजी शुभारंभ 

सावंतवाडी : कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सावंतवाडी यांच्या वतीने सालईवाडा येथे नवीन शाखा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन बुधवार १८ जून रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

     या उद्घाटन समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून रेव्ह. फा. मिलेट डिसोझा, रेक्टर, मिलाग्रीस कॅथेड्रल, सावंतवाडी, श्रीमती. अ‍ॅमी पीटर डॉन्टस, मा. डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग आणि मा. संजय संभाजी कदम सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सावंतवाडी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या प्रसंगी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती. आनमारी जॉन डिसोझा, व्हा. चेअरमन श्री. पीटर लॉरेन्स दिया, सेक्रेटरी श्री. मार्टिन झुले आलमेडा यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.

संस्थेचे प्रधान कार्यालय केसरकर कॉम्प्लेक्स, गांधी चौक, सावंतवाडी येथे असून, संस्थेने आपल्या सर्व सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांना कळविले आहे की, त्यांच्या सदिच्छा व सहकार्यामुळे पतसंस्थेची प्रगती होत असून, सभासद ग्राहकांना अधिक तत्पर व सुलभ सेवा देण्यासाठी ही नवीन शाखा सुरू करण्यात येत आहे.

नवीन शाखेचा पत्ता रत्नेश प्लाझा, सालईवाडा, सावंतवाडी असा असून संस्थेने सर्व सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.