वार्ताहर l पाली :गेल्या काही वर्षांमध्ये जि.प. पाली क्र.१ शाळेने नवोदय, शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत येण्याबरोबरच क्रीडा स्पर्धेत जिल्हा पातळीवर विद्यार्थी चांगले यश संपादन करीत आहेत.पाली जि.प.च्या प्राथमिक मराठी शाळेची शैक्षणिक प्रगती ही जिल्ह्यातील शाळांसाठी निश्चितच उत्तम उदाहरण आहे असे प्रतिपादन डाएट रत्नागिरीचे प्राचार्य डॉ सुशील शिवलकर यांनी केले.
पाली येथे आज जि.प.आदर्श विद्यामंदिर पूर्ण प्राथमिक शाळा क्र.१ मध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अधिव्याख्याता राहुल बर्वे, दीपा सावंत, जिल्हा समन्वयक निकुंबे सर, पाली सरपंच विठ्ठल सावंत,अॅड.सागर पाखरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष प्रार्थना ठीक,पूर्वा पावसकर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत शैक्षणिक पालखी दिंडी काढून स्वागत करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश वेळी पहिल्या पाऊलाचा ठसा उमटवण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तक वाटप करून सत्कार करण्यात आला. यावेळी पाली शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, शिक्षक ममता सावंत, मारुती घोरपडे,श्रद्धा रसाळ,नेहा जाधव, श्रुती वारंग उपस्थित होते.
फोटो ओळी- पाली शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करताना अॅड.सागर पाखरे, सरपंच विठ्ठल सावंत, उमेश शिंदे.












