कणकवली : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे श्री. Wee An Tuan (वर्किंग इन इंडियन एम्बसी, व्हिएतनाम आणि सिलिकॉन व्हॅली, USA सोबत संलग्न) तसेच श्री. प्रथमेश केसवेकर , टास्क फोर्स इंचार्ज, mSME ( भारत सरकार) यांनी सदिच्छा भेट दिली. श्री. Wee An Tuan यांनी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, पीसीबी डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग या विषयावर विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, पीसीबी डिझाईन आणि उत्पादन या क्षेत्रातील त्यांचा अनुभव महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर सायन्स विभागास भेट देत सर्वांशी संवाद साधला. त्यांनी जागतिक पातळीवरील तांत्रिक ट्रेंड्स, इलेक्ट्रॉनिक उत्पादन प्रक्रियेमधील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, आणि स्टार्टअप संधींबाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांनी श्री. Wee An Tuan व श्री. प्रथमेश केसवेकर यांचा विशेष सत्कार केला आणि त्यांचे मार्गदर्शन हे सर्वांना मार्गदर्शक ठरेल असे मत व्यक्त केले आणि भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.










