Organized Bhajani Bua Mela on 10th June at Shri Ram Temple, Ratnagiri
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील भजनी बुवांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच भजनी बुवांच्या पारंपारिक भजनीकलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी येथील श्रीराम मंदिरात येत्या शनिवार दिनांक 10 जून रोजी सायंकाळी चार वाजता भजनी बुवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात श्रीराम मंदिर संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक तथा दै. रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे प्रमुख संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि सचिव सुरेंद्र घुडे यांनी ग्रामीण व शहरी भागातील भजनी बुवांना या मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या समस्या अनुभव आणि सूचना मांडण्याचे आवाहन केले आहे. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा यांच्याकडे आतापर्यंत 45 भजनी बुवांची नोंद झाली असून त्यांच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. येत्या 10 जूनच्या मेळाव्यात जास्तीत जास्त भजनी बुवांनी सहभागी व्हावे, असे संयोजकांनी आवाहन केले आहे.