गिरोडे येथील पांडुरंग वसंत गवस हा युवक बेपत्ता

दोडामार्ग | प्रतिनीधी : दोडामार्ग तालुक्यातील गिरोडे येथील पांडुरंग वसंत गवस ( 32 ) हि व्यक्ती शनिवार 23 डिसेंबर रोजी बेपत्ता असल्याची माहिती दोडामार्ग पोलिसांनी दिली आहे.

याबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग गवस याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने त्याला उपचार करण्यासाठी रत्नागरी येथे मनोरुग्णालयात न्यायचे होते.

मात्र हि गोष्ट त्याला समजतातच तो गिरोडे मळयेवाडी येथील आपल्या काजू बागेतून पळून गेला तो अद्याप पर्यंत आलाच नाही. म्हणून त्याची आई अनिता वसंत गवस हिने दोडामार्ग पोलिसांत पांडुरंग गवस बेपत्ता असल्याची तक्रार दिल्याचे दोडामार्ग पोलिसांनी सांगितले