दापोली l प्रतिनिधी: “शेतकरी व विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी हे वेगवेगळे नसून एकत्रच आहेत त्यामुळे सगळे जर एकत्र आले तर आपल्याला आपल्या गावाचा विकास नक्कीच साधता येईल.” असे प्रतिपादन विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले. कृषि महाविद्यालय दापोली तर्फे नव्याने दत्तक घेण्यात आलेल्या दापोली तालुक्यातील किन्हळ, तसेच खेड तालुक्यातील सुसेरी गावात शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक तत्वावर आयोजित करण्यात आलेला ‘भात व भाजीपाला बियाणे वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून शेतीचे फायदे तसेच महत्व सांगून शेतीचा विकास कसा साधता येईल असेही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले. तसेच प्रत्येकाने आपल्या जन्मनक्षत्र आणि राशीनुसार किमान एक झाड लावून त्याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. या प्रसंगी विस्तार शिक्षण विभागाचे वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. मंदार पुरी, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे, सौ. शिल्पा नाईक, कृषि सहाय्यक श्री. नरेश आईनकर, श्री. समीर उसरे, कृषि विभागाच्या कृक्षि सहाय्यक सौ. वैदेही गुहागरकर तसेच किन्हळ गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. उदय रेवाळे, गणेश चिपटे तसेच इतर शेतकरी श्री. सुरेश डायनाक, यशवंत रेवाळे, अशोक येसवारे, दिलीप येसवारे, करूणा चिपटे, अंजली रेवाळे, समिधा येसवारे, श्रावणी रेवाळे, सुजाता पवार आदी उपस्थित होते. तसेच खेडमध्ये भात बियाणे वाटपाच्या कार्यक्रमाकरीता खेडचे सरपंच श्री. संतोष कंचावडे व शेतकरी प्रविण जाखळ, गंगाराम कंचावडे, सचिन निमरे, संदेश महाडिक, श्रीकांत भांबीड, किसन पवार, प्रकाश माळी, सदाशिव कानाळ, द्रौपदी करबटे, राकेश म्हादे, विनायक शिंदे, गणेश कानाळ आदी उपस्थित होते. या कार्यकमात उपस्थित शेतकन्यांना रत्नागिरी ६ आणि रत्नागिरी ८ या जातीच्या भातबियाण्यांचे तसेच भाजीपाला बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यकमाचे प्रास्ताविक डॉ. मंदार पुरी यांनी केले. भात बियाण्या संबंधी थोडक्यात माहिती त्यांनी प्रास्ताविक करताना सांगितली. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. मंदार पुरी, डॉ. प्रवीण झगडे, शिल्पा नाईक, नरेश आईनकर, समीर उसरे, वैदेही गुहागरकर, तसेच शिपाई चंद्रकांत साळवी व वाहन चालक प्रविण पवार यांनी मेहनत घेतली.









