रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील परटवणे येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 29 मार्च रोजी सायंकाळी 6.20 वा. करण्यात आली.
स्वप्निल सुदाम वायंगणकर (रा.आंबेशेत,वायंगणकरवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी तो परटवणे येथे मटका जुगार खेळ चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 528 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












