कुडाळ येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजन

कुडाळ :अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सजग कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कुडाळ हायस्कूल येथे कार्यकर्ते प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

उद्घाटन सत्रात सचिव अजित कानशिडे यांनी प्रस्तावना मांडली. यानंतर प्रमुख पाहुणे तहसीलदार साहेब वीरसिंग वसावे यांनी मार्गदर्शन केले. तसेच अ.भा. अंनिस चे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजीव बिले यांनी आपल्या सखोल विश्लेषणातून तसेच विविध उदाहरणातून समाजातील अंधश्रद्धेवर भाष्य केले.

अंधश्रद्धा निर्मूलनात युवकांचे कार्य याविषयावर सी.ए. युगांत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. महिला आणि अंधश्रद्धा या विषयावर ॲड. गौरी पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत तज्ञ विज्ञान शिक्षक पठाडे यांनी बाबा, बुवा, मांत्रिक जे चमत्कार करून दाखवतात ते वैद्न्यानीक प्रयोगांचा आधारे सादर करून दाखवले. तसेच आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत कसे विज्ञान दडले आहे हे देखील सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांपैकी पनदुर हायस्कूल चे मुख्याध्यापक पवार सर, संविता आश्रम चे सर्वेसर्वा संदीप परब, अ भा अंनिस च्या महिला संघटिका सौ. रुपाली पाटील तसेच अंनिस चे खोटलेकर यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केले.

कार्यशाळेचे आयोजन व समन्वय अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्ग शाखेचे सचिव अजित कानशिडे, संघटक विजय चौकेकर व अध्यक्ष अ‍ॅड. राजीव बिले यांनी केले. आभार शांती भाटकर यांनी मानले.