रत्नागिरी : श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुट्टपर्ती, आंध्रप्रदेश येथून निघालेल्या रथाचे रत्नागिरीत गुरुवार दिनांक ०५ जून रोजी आगमन झाले होते.
श्री सत्यसाई बाबांचा सत्य, धर्म, शांती आणि प्रेमाचा संदेश घेऊन पुट्टपर्ती, आंध्रप्रदेश येथून बाबांच्या दिव्य पादुका असलेले सहा रथ सर्व भारतभर दर्शनासाठी निघाले आहेत. त्यातील एक दिव्य रथ गोवा राज्यात भ्रमण करून रत्नागिरी येथे ५ ते ६ जून दरम्यान आला होता. हा साईरथ शहरातील श्री गजानन महाराज मंदिर,पॉवर हाऊस, नाचणेरोड येथे दर्शनासाठी उपलब्ध होता. सर्व साईभक्तांनी उत्स्फूर्तपणे श्री पादूकांचे स्वागत केले व दर्शनाचा लाभ घेतला.
दिनांक ०५ व ६ जून रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. सिद्धार्थ कस्तुरीरंगन (प्राध्या, मुंबई विद्यापीठ) यांचे व्याख्यान, भक्तिगीतांचा कार्यक्रम,भजन, महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भक्तांनी याचा लाभ घेतला. तसेच बाबांचे कार्य आणि समाधीदर्शन घेण्यासाठी पुट्टपर्ती येथे जाण्यासाठी खूप लोकांनी इच्छा प्रदर्शित केली असे श्रीसत्यसाईबाबा सेवा समिती, रत्नागिरी यांचेकडून सांगण्यात आले.
Home महत्वाच्या बातम्या श्री सत्यसाईबाबांच्या दिव्य पादुका दर्शन व रथोत्सव रत्ननगरीत उत्साहाने साजरा












