चिपळूण (वार्ताहर) : गेल्या काही महिन्यापासून महावितरणने लाईट बिल दरात भरमसाठ वाढ केली आहे. शहरातील नागरिक कोणतेही तक्रार न करता लाईट बिल भरत असतात. महावितरण प्रत्येक सोमवारी लाईट मेंटेनन्स साठी बंद करतात. आठवड्यातून लाईट एक दिवस बंद केल्याने नागरिक कोणतेही तक्रार करत नाही. मात्र सोमवार वगळून गेल्या दोन महिन्यापासून मे आणि जून महिन्यात सातत्याने लाईट बंद करण्यात येत आहे. मे महिन्यात तापमान ४० डिग्री असताना रात्रीच्या वेळेस लाईट बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आता तर जून महिना सुरू झाला आहे. पाऊस पडायला सुरुवात झाली की लाईट बंद केली जाते. याबाबतचे अधिकाऱ्यांना विचारले असता पाऊस सुरू आहे वादळ येणार आहे अशी कारण देऊन लाईट बंद केली जाते. पाऊस सुरू झाल्याने रात्रीच्या वेळेस सरपटणारी प्राणी बाहेर पडत असल्याने जीवित हानी होण्याची शक्यता आहे. सातत्याने लाईट बंद केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच लाईट जाऊन सुद्धा बिल आवाच्या सवा येत असल्याने नागरिकांना प्रश्न पडला आहे. लाईट बंद असल्याने महावितरण गरीबाची लूट करत आहे ही लूट थांबली पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजीद सरगुरोह यांनी केली आहे.












