लायन्स् क्लब व लिओ क्लब चिपळूणचा दिमाखदार पदग्रहण सोहळा संपन्न

 

चिपळूण (प्रतिनिधी) : सन २०२४-२५ या वर्षासाठी लायन्स् क्लब चिपळूणच्या ऩुतन अध्यक्षाची सुत्रे संजीवनी प्रशिक्षण संस्था संचालित डिएमएल्टी नर्सिंग कॉलेजचे डिन लायन जगदीश वाघूळदे व लिओ क्लबचे नूतन अध्यक्ष लिओ प्रथमेश पोंक्षे यांनी दि ५ ऑगस्ट सोमवारी नामदेव शिंपी समाज मंदिर हॉल महालक्ष्मी नगर खेंड चिपळूण येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात स्विकारली.

लायन्स् व लिओ क्लब चिपळूण यांचा एकत्रित पदग्रहण शपथविधी सोहळा प्रांत ३२३४ ड १ चे प्रथम उप प्रांतपाल एमजेएफ ला डॉ विरेंद्र चिखले व रिजन ५ झोन २ च्या झोन चेअरमन ला प्रांजल गुंजवटे सह शपथ प्रधान अधिकारी लायन्स क्लब कुरूंदवाड चे ला अँड विजय जमदग्नी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सन २०२४-२५ या लायनेस्टीक वर्षासाठी लायन जगदीश वाघूळदे व लिओ प्रथमेश पोंक्षे यांनी मावळते लायन्स अध्यक्ष ला नहुष चितळे व लिओ अध्यक्ष लिओ शाम परांजपे यांचेकडून अध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारली लायन्स् सचिव ला राजीव कांबळे व लिओ सचिव लिओ डॉ रजत दाभोळकर तसंच लायन्स खजिनदार ला अरूण कदम व लिओ खजिनदार ला. कौस्तूभ अभ्यंकर सह संपूर्ण लायन्स् लिओ संचालक मंडळाने पद ग्रहण केले. प्रमुख पाहुणे प्रथम उपप्रांतपाल ला डॉ विरेंद्र चिखले यांनी लायनिझम चं महत्व सेवाकार्य यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे पौरोहित्य करणारे ला अँड विजय जमदग्नि यांनी लायन्स् व लिओ क्लब च्या संचालक मंडळास शपथ दिली व जबाबदारी व कर्तव्याची जाणीव करून दिली. २१७ देशांमधील १५ लाखा पेक्षा जास्त सदस्य संख्या असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लायन्स् क्लब्ज इंटरनँशनल या एनजीओ मधे एक इंटरनँशनल अध्यक्ष व दुसरे लायन्स् क्लब अध्यक्ष ही दोनच पदं अत्यंत महत्वाची असून क्लब अध्यक्षांची धुरा लायन जगदीश व लिओ प्रथमेश यशस्वीपणे संभाळतील असा विश्वास व्यक्त केला लायन्स् नवीन सदस्य लायन ओंकार रेडीज व लिओ यश शेलार यांना नवीन सदस्य पदाची शपथ दिली समाजातील तळागाळातील उपेक्षित घटकांसाठी आपण सर्व लायन्स् परिवाराने आपला वेळ, बुध्दी व संपत्ति काही प्रमाणात खर्च करून गरजवंताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येण्यासाठी तुमचं योगदान महत्वाचे आहे असं आपल्या ओघवत्या शैलीत सांगुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.

लायन्स् नुतन अध्यक्ष ला जगदीश यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रांतपालांनी दिलेल्या अँक्शन प्लँन प्रमाणे नेहमीची दृष्टी प्रथम, आरोग्य, शैक्षणिक, स्वच्छता, ही सेवाकार्य करणारच आहे त्याच बरोबर दोन महत्वाचे परमंनंट प्रोजेक्ट म्हणजेच लायन्स् ची स्वमालकीची मोठी जागा खरेदी करणे व त्याठिकाणी लायन्स् इंटरनँशनल स्कूल सुरू करणार आहे त्याचबरोबर चिपळूण शहराच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाच्या सहकार्याने विशेष प्रयत्न करणार आहे. लायन्स् क्लब चिपळूण ला विविध सेवाकार्यासाठी नेहमी सहकार्य करणारे मंडळ अधिकारी श्री उमेश राजेशिर्के साहेब व चिपळूण नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री मंगेश पेढांमकर साहेब यांना लायन्स् गौरव पुरस्कार देवून सम्मानित करण्यात आलं त्याच बरोबर पर्शुराम देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल ला जिवन रेळेकर व जेष्ठ लायन एमजेएफ श्रीनिवास परांजपे हे पीएमजेएफ झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, ला अमर शेट्ये, ला वसंत उदेग, ला चंद्रकांत मांडवकर यांनी केलेल्या विशेष सेवाकार्याबद्दल इंटरनँशनल कडून आलेले सन्मान पत्र व मानाची पिन प्रमुख पाहूण्यांचे हस्ते देवून सम्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला माजी आमदार रमेशभाई कदम, सतिष खेडेकर, मिलिंद कापडी, आशिष खातू यांचे सह लायन्स् क्लब चिपळूण, लिओ क्लब, गँलक्सी, युनिटी, गुहागर, खेड, दापोली, सावर्डा, संगमेश्वरचे बहूसंख्य सदस्य व चिपळूण तालूक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संखेने हजार होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ला अमर शेट्ये, श्रीनिवास परांजपे, मिलिंद मुद्राळे, राजकुमार जैन यांचे सह संपूर्ण लायन्स् व लिओ क्लब ने विषेश परिश्रम घेतले खुमासदार शैलित सुत्रसंचल ला राजकुमार व ला मिलिंद यांनी करून सभाग्रहाला मंत्रमुग्ध केले नूतन सचिव ला राजीव कांबळे यांनी आभार व्यक्त केले.