रत्नागिरी | प्रतिनिधी
शहरातील काँग्रेस भवन येथे अज्ञात प्रौढाचा मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवार 16 जून रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास उघडकीस आली.
सोमवारी सायंकाळी काँग्रेस भवन येथील एका हॉटेल समोर तेथील नागरिकांना एक प्रौढ बेशूध्द अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी त्याला 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरु असताना मंगळवार 17 जून रोजी रात्री 12.15 वा. सुमारास त्याचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे









