रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा पोलिस भरती सन 2024-25 साठी मिरजोळे एमआयडीसी येथील क्रिडा संकुलात शुक्रवार 13 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 884 उमेदवारांना भरती प्रक्रिसेसाठी पोलिस दलाकडून बोलावण्यात आले होते. त्यातील 553 उमेदवार हजर होते. त्यातील 84 उमदेवार अपात्र ठरले असून 247 उमेदवार या भरतीसाठ गैरहजर राहिले होते.
शिपाई आणि चालक शिपाईच्या 108 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु असून प्रथ्ाम मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. शुक्रवारी 884 पुरुष उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले होते. 884 पैकी 553 उमेदवार या भरतीप्रक्रियेसाठी हजर होते. या 553 पैकी 84 उमेदवार उंची आणि छाती कमी भरल्याने या भरतीसाठी अपात्र ठरले. उर्वरित उमेदवारांच्या 1600 मिटर धावणे,100 मिटर धावणे आणि गोळा फेक अशा तिन प्रकारच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या.
शुक्रवारी सकाळी 5.30 वा.पासून या भरतीप्रक्रियेला सुरुवात झाली. भरतीप्रक्रियेच्या ठिकाणी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे,अपर पोलिस अधिक्षक बी.बी.महामूनी,उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर,शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील,ग्रामीण्ा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे तसेच 400 पोलिस कर्मचारी उपस्थित होते.










