शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत दिव्यांग कल्याण निधी योजनेतून दिव्यांग लाभार्थीला इलेक्ट्रिक दुचाकी प्रदान

 

सरकारच्या माध्यमातून ३६५ दिवस जनकल्याणकारी योजना राबवण्याचा हेतू ; आ. नितेश राणे

कणकवली : शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत दिव्यांग कल्याण निधी योजनेतून कणकवली नगरपंचायतच्यावतीने आ. नितेश राणेंच्या हस्ते रुबाब बादशहा पटेल या दिव्यांग लाभार्थीला इलेक्ट्रिक दुचाकी प्रदान करण्यात आली.

यावेळी नगरपंचायत प्रशासक तथा प्रांताधिकारी जगदीश कातकार, मुख्याधिकारी अवधूत तावडे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेविक मेघा गांगण, माजी नगरसेवक अभि मुसळे, रवींद्र गायकवाड, किशोर राणे, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप राणे, महेश सावंत, अभय राणे, राजा पाटकर, किशोर धुमाळे, तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आ. नितेश राणे म्हणाले, आमचे सरकार हे ३६५ दिवस जनकल्याणकारी योजना राबवण्याचा हेतू आहे. त्यानुसार आपले सरकार गतिमान आहे. यापूर्वी दिव्यांग लाभार्थ्यांना ५हजार ५१८ रुपये भत्ता व पेट्रोलच्या बाईक दिल्या जात होत्या. असे एकूण ७७ लाभार्थी आहेत. त्यापैकी शासन आपल्या दारी उपक्रमातून रुबाब पटेल या लाभार्थीला १ लाख २९ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक बाइक प्रदान करण्यात आली.