खेड आगाराच्या गळक्या गाड्यांमुळे प्रवासी मेटाकुटीस

खेड (प्रतिनिधी) आगारातून सोडण्यात येणाऱ्या गळक्या व नादुरुस्त
बसेसमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. बुधवारी येथील बसस्थानकातून मार्गस्थ झालेल्या खेड-सार्पिली बसला पूर्णतः गळती लागली होती. यामुळे नेमके कोणत्या आसनावर बसायचे असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा ठाकला. इतरही मार्गावर अशाच बस सोडण्यात येत  असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे.
अनेक प्रवासी उभे राहूनच प्रवास करत आहेत. याबाबत चालक-वाहकही उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने प्रवाशांचा संताप अनावर होत आहे. त्यामुळे आगाराने मार्गावर सुस्थतीतील बस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.