जिमखाना येथील रहिवासी आनंद जाधव यांचे निधन 

 

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान, भटवाडी येथील रहिवासी आणि आनंद आत्माराम जाधव (वय ४०) यांचे काल रात्री अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंतवाडी शहरात शोककळा पसरली आहे.

आनंद जाधव हे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांचे चुलत भाऊ होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि एक मोठा परिवार आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता.

आज दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने जाधव कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.