
रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र, यांच्या वतीने राजापूर येथील जि.प.प्राथमिक केंद्र शाळा, भालावली नं. 1 या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना करीयर मार्गदर्शन व वह्या वाटप व त्याचबरोबर संतोष प्रतिष्ठान यांचे वतीने शाळेतील विदयार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण मिळण्यासाठी संगणक देण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सचिव श्री. केदारजी चव्हाण, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. श्री. महेंद्र मांडवकर, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक श्री. संदिप पाटील सर, श्री. जितेंद्र ठाकूर, श्री.विरेश भुते, श्री. राज फुटक त्याचप्रमाणे श्री. संतोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.कृष्णा सावंत , उपाध्यक्ष श्री.बावकर , सचिव श्री. सुनील शिवगण, माहिती अधिकार महासंघ, प्रचारप्रमुख श्री.प्रकाश चव्हाण, शाखाप्रमुख श्री. रविकांत जोशी, रायगड स्वाभिमान या वृत्तपत्राचे पत्रकार श्री. संदिप सर , त्याच प्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, शालेय कमिटी अध्यक्ष, व सर्व विदयार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सचिव श्री. केदार चव्हाण व जिल्हाध्यक्ष ॲड. श्री. महेंद्र मांडवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व श्री. पाटील सर यांनी सर्व विदयार्थ्यांना योग्य करीयर मार्गदर्शन केले. त्यानंतर संतोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.कृष्णा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यानंतर विदयार्थ्यांना वह्या वाटप व संगणक देण्यात आला. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला..












