महिलांना स्वावलंबी सक्षम बनविणार : ना. योगेश कदम

दापोली l प्रतिनिधी: उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती दापोली यांच्या माध्यमातून ‘राणी लक्ष्मीबाई महिला प्रभागसंघ जालगांव’, दापोली यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

 

यावेळी बोलताना योगेश कदम यांनी राज्यातील अनेक उद्योग आपल्या मतदार संघात येणार असून, महिला सक्षमीकरण करून महिलांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार त्यानी या बैठकीत व्यक्त केला. पुढील काळात २५ लाखांचा निधी उपलब्ध करून, जालगांव येथे स्वतंत्र प्रभाग कार्यालय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी घोषित केले. यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल महिला बचतगटांना प्रशस्तीपत्र देऊन योगेशदादा कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सभेला दापोली पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. गणेश मंडलिक,माजी सभापती आणि शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई,तालुकाप्रमुख उन्मेश राजे,जालगांव सरपंच अक्षय फाटक,तालुका महीला संघटक सौ दित्पी निखार्गे,महीला संघटीका सौ ममता शिन्दे,माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर,आदी मान्यवर तसेच महिला बचत गटाच्या पदाधिकारी आणि सर्व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.