मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आले कार्यक्रम

लांजा (प्रतिनिधी) राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा तालुका भाजपाच्या वतीने आज रविवारी लांजा तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले .
मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा सोमवारी २३ जून रोजी वाढदिवस असून या निमित्ताने लांजा तालुका भाजपाच्या वतीने आज रविवारी लांजा शहर आणि तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये महिलाश्रम लांजा या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थेमध्ये जाऊन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील मुलांना कपडे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. महिलाश्रम संस्थेच्या वतीने याबद्दल भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले. अशा प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून महिलाश्रम मधील मुलांसाठी घेण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे यावेळी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यानंतर विलवडे येथील प्रतीक्षा या मतिबंध मुलांच्या शाळेत जाऊन तेथील देखील संस्थेत फळे आणि खाऊ वाटप करण्यात आले. तर लांजा येथील वृद्धाश्रमात जाऊन येथील वृद्धांना फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले .
अशाप्रकारे विविध सामाजिक संस्थांमध्ये जाऊन लांजा तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने आपली सामाजिक बांधिलकी जपत येथील मुलांशी, वृद्ध यांच्याशी आपुलकीने संवाद साधला याबद्दल त्या- त्या संस्थेच्या पदाधिकारी शिक्षक वर्ग यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.
. आपल्या नेत्याचा वाढदिवस केवळ बॅनरबाजी करून आणि फटाके वाजवून साजरा न करता समाजातील दिनदलितांसाठी काम करणाऱ्या संस्थेत जाऊन त्यांच्याशी हितगुज, संवाद साधत त्यांना फळ वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल भाजपा पदाधिकारी यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे
दरम्यान , या सर्व कार्यक्रमांना भाजपा दक्षिण मंडळ तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, उत्तर मंडळ तालुकाध्यक्ष, विराज हरमले, माजी नगरसेवक संजय यादव, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, माजी शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, माजी नगरसेवक मंगेश लांजेकर, तुकाराम प्रीदावनकर, प्रथमेश बेंडल, अजय गुरव, श्रीकृष्ण हेगिस्टे, बेर्डे, अशोक पाटोळे, मधुकर पालये, वाघोजी खानविलकर, प्रभाकर टोले राजेश बेर्डे, दीक्षा खामकर, दीपक कानशे , मालीम, राजेंद्र धनावडे,आधी पदाधिकारी उपस्थित होते











