कणकवली : राज्याचे मस्त्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मोठ्या उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मस्त्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अशोक राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्रकाश सावंत, विठ्ठल देसाई, रणजित देसाई, संतोष कानडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home सिंधुदुर्ग कणकवली मस्त्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे...











