डोंगर गावचे सरपंच, उपसरपंच सहित ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

आमदार किरण सामंत यांनी केले पक्षात स्वागत

जाती- पातीच्या पलीकडे जाऊन मतदार संघातील विकास काम करणार- आमदार किरण सामंत

राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील डोंगर गावातील जमातुल मुस्लिम डोंगरच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निर्णय घेत आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेना पक्षाचा भगवा हातात घेतला. त्यांच्या समवेत डोंगरगावच्या सरपंच जुबेदा मस्थान, उपसरपंच विजय आमरे यांच्या सहित ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी आमदार किरण सावंत यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश आहे. त्यांचे आमदार किरण सामंत यांनी पक्षात स्वागत केले.

यावेळी पक्ष प्रवेशाचे औचित्य साधून आमदार किरण सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, आज तालुका भगवा मय होतोय जनतेने येणारी वेळ ओळखली आहे त्यामुळे अनेक मान्यवर आपल्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. मात्र डोंगरगावच्या मुस्लिम समाजाने एकमुखी निर्णय घेत शिवसेना पक्षात येण्याचा निर्णय घेण्याचे करावे तेवढे कौतुक थोडंच असल्याचे मत आमदार किरण समर्थ यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केले. निवडणुकीच्या काळात फेक माहिती वरती नाराज असलेल्या मुस्लिम समाजाने आता शिवबंधन बांधण्याची सुरुवात केली त्याची सुरूवात आज डोंगर गावापासून झाली असल्याचे सांगितले. मी जनतेचा आमदार आहे. माझ्याकडे कोणतीही जात धर्म पंथ चालत नाही मी सर्वसामान्यांना, सर्वधर्मसमभावाने हातात हात घालून पुढे घेऊन जातो. त्यामुळे डोंगरवासी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, त्यांना कधीही कोणत्या विकास कामाला निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले. विकासासाठी घाबरायची गरज नाही कारण प्रत्येक कार्यकर्ता आमदार झालाय हे सांगायला ही ते विसरले नाही.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर, अर्बन बँकेचे संचालक प्रसाद मोहरकर, नाना कोरगावकर, दीपक बेंद्रे, सरपंच जुबेदा मस्तान, उपसरपंच विजय आंब्रे, जमातून मुस्लिम डोंगरचे अध्यक्ष इम्रान डोंगरकर, यासीन तांडेल, नंदू मिरगुळे, योगेश नकाशे, शकील मस्तान, खलील मस्तान, हनीफ काझी, अजित घाणेकर, नरेश दुधवडकर, अजित घाणेकर, सुशांत कविस्कर, वासुदेव गुरव, यांच्यासहित जमातून मुस्लिम डोंगरचे सर्व पदाधिकारी तसेच मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.