Police action against those playing Adoshala Jagar of Tapri at Nachane
रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरानजीकच्या नाचणे येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई बुधवार 7 जून रोजी सायंकाळी 4.30 वा.नाचणे येथील महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालयाच्या भिंतीलगत टपरीच्या आडोशाला करण्यात आली.
समिर अशोक खाडे (47,रा.वरचे टेंंबे खाडेवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.बुधवारी सायंकाळी शहर पोलिस नाचणे परिसरात गस्त घालत असताना त्यांना महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालयाच्या भिंतीलगत टपरीच्या आडोशाला संशयित कल्याण मटका जुकाराचे साहित्य व रोख रक्कम जवळ बाळगून खेळ चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 3 हजार 80 रुपयांचा मुद्देंमाल जप्त केला.त्याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











