Chiplun: A case has been registered against four people for consuming liquor in public places in Dahivali Ozharwadi.
रत्नागिरी | प्रतिनिधी : चिपळूण तालुक्यातील दहिवली ओझरवाडी येथे बेकायदेशिरपणे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करुन गैरशिस्तिचे वर्तन करणार्या चार जणांविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई बुधवार 7 जून रोजी सायंकाळी 6.45 वा.करण्यात आली.
पुजित घाग (32),शैलेश सावंत (30),आदित्य खांबे (22) आणि निखिल मुंडेकर (21) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल उमेश कांबळे यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,बुधवारी सायंकाळी यातील चारही संशयित हे दहिवली ओझरवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ मद्यप्राशन करुन गैरशिस्तिने वर्तन करत असताना ही कारवाई करण्यात आली.संशयितांकडून 980 रुपयांच्या बियरच्या 5 बाटल्यांचा मद्देमाल नष्ट करण्यात आला.संशयितांविरोधात महाराष्ट्र दारु अधिनियम कायदा 85,86 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










