चिपळूण : अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींना उद्योजकतेकडे प्रवृत्त करून स्वावलंबी बनवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बाट) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमईडीसी) रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्याचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा बुधवारी समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावंडे, वरिष्ठ उद्योग निरीक्षक अर्चना सकपाळ, प्रशिक्षक समन्वयक, दिनकर कांबळे, बाटचे अतिरिक्त प्रकल्प अधिकारी आशिष कांबळे, बाटच्या समतादुत माहेश्वरी विचारे, समन्वयक सुशांत खानविलकर यांच्यासह माजी सैनिक मेजर संतोष मोहिते, सामाजिक कार्यकर्ते सचिन मोहिते, सेवानिवृत्त शिक्षक प्रदिप जाधव, अजित जाधव यांच्यासह प्रशिक्षणाथ उपस्थित होते. यावेळी माहेश्वरी विचारे, आशिष कांबळे, अर्चना सकपाळ, रामचंद्र गावंडे तसेच संतोष मोहिते यांनी उपस्थित प्रशिक्षणाथना उद्योजकते संदर्भात मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमात विवध तज्ज्ञ व्यक्तींनी उपस्थित राहून उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, कारखाना भेटी, उद्योगाला लागणारे विविध नोंदणी व परवाने,स्टार्ट अप इंडिया, मुद्रा योजना, मेक इन इंडिया, यशस्वी उद्योजक समवेत चर्चा, उद्योग उभारणी, उद्योग निवड प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, महिला उद्योजकांकरिता विशेष धोरण,प्रकल्प अहवाल, निधी उभारणी,स्टैंड अप इंडिया, शासनाचे औद्योगिक धोरण इत्यादी, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी (कृषी, सेवा, आस., केमिकल, प्लास्टिक इं विविध कार्यालय व महामंडळांच्या कर्ज योजना, अभिप्रेरणा प्रशिक्षण, विक्री व व्यवस्थापन कौशल्य, कंपनी नोंदणी व प्रक्रिया आदींची माहिती दिली.












