कुशल नेतृत्व, दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय गोविंदराव शिर्के

आदर्श विद्यामंदिर चिवेली येथे २७ वा स्मृतीदिन साजरा

संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचालित आदर्श विद्या मंदिर चिवेली येथे स्वर्गीय गोविंदराव शिर्के यांचा २७ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबांनी दिलेले शैक्षणिक साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.

गेली २७ वर्ष या आदर्श विद्यामंदिरामध्ये ज्यानी चिवेली गावाच्या विकासामध्ये आणि हे आदर्श विद्यामंदिर चिवेलीचे शिक्षण संकुल उभारण्यामध्ये अनमोल कामगिरी केली असे स्वर्गीय गोविंदराव शिर्के यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. दिनांक २२ जून १९९८ रोजी त्यांचे निधन झाले. तेव्हापासून एक कुशल नेतृत्व आणि कर्तुत्वाने श्रेष्ठ असणाऱ्या स्व. गोविंदराव शिर्के यांचा स्मृतिदिन विद्यार्थ्यांसमवेत साजरा केला जातो.
याही वर्षी २२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्व. गोविंदराव शिर्के यांच्या प्रतिमेस शाखा समितीचे अध्यक्ष सुभाष शिर्के यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला शालेय स्कूल समितीचे चेअरमन पत्रकार संतोष कुळे , शालेय समितीचे सदस्य दयानंद कदम, संस्थेचे सदस्य राजेंद्र मेढेकर, उपस्थिती होते.

यावेळी इयत्ता दहावी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉ. विजय गोविंदराव शिर्के यांनी दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप सुद्धा विद्यार्थ्यांना करण्यात आले.

शालेय समितीचे चेअरमन संतोष कुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सामाजिक क्षेत्राची जाणीव असणारे आणि दूरदृष्टी ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थितीचा अभ्यास करत ज्यांनी चिवेली पंचक्रोशीमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला ते स्व. गोविंदराव शिर्के आजच्या पिढीला एक प्रेरणादायी नेतृत्व आहेत. त्यांनी मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा नगरसेवक आणि तेथील स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूसवले होते, यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची गुणवत्ता आपल्याला दिसून येते. त्यांनी आदर्श विद्यामंदिर चिवेलीची स्थापना १९७० मध्ये केली. सर्वांशी जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध असल्यामुळे राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांचा शब्द प्रत्येक पक्षातील नेते कधी टाळत नव्हते, असे हे कर्तुत्वाने श्रेष्ठ असणारे व्यक्तिमत्व होते. त्यांचा स्मृतिदिन निश्चितच भावी पिढीसाठी एक नवी दिशा आणि प्रेरणा देणारा ठरेल असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शांताराम शिबे सुभाष शिबे, सौ आदिती जुवळे, प्रकाश दणदणे, मनोज जाधव, सानिका शिबे, विघ्नेश शिबे, पायल कोंडविलकर, सर्व शिक्षक रुंदक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गुरुव यांनी केले तर आभार श्री चव्हाण यांनी मानले.