संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते शुभारंभ ; जिप माजी अध्यक्ष अशोक सावंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : सुकळवाड ओरोस येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मालवण मधून थेट बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बस सेवेचा शुभारंभ संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
विद्यार्थी – विद्यार्थिनींची शैक्षणिक गैरसोय टाळून त्यांना कॉलेज पर्यत सुलभ प्रवास करता यावा या उद्देशाने ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे.
ओरोस रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजने आपल्या दर्जेदार शिक्षणातुन नावलौकिक प्राप्त केला आहे. या कॉलेजमध्ये मालवणसह जिल्ह्यातील मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांना शासनाच्या निकषप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जात असून विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जात आहे. येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना एसटी प्रवासात होणारी अडचण लक्षात घेऊन कॉलेजच्या वतीने थेट मालवण ते कॉलेज पर्यंत बस सेवा सुरु करण्यात आली आहे. याचा शुभारंभ सोमवारी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, राकेश सावंत, अक्षय परुळेकर, अपर्णा मांजरेकर, रोशनी वरक, अनिरुद्ध झांटये, भिकाजी जाधव, सुनील शिवगण, गितेश राणे, निखिल तेंडोलकर यांसह अन्य उपस्थित होते. जिल्ह्यातील अन्य भागातून देखील विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता भासल्यास अशा प्रकारे बस सेवा सुरु करणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांनी दिली आहे.
फोटो : एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मालवणातून थेट बससेवा सुरु करण्यात आली असून संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. (अमित खोत, मालवण)










