सायंकाळी ४ वाजता निघणार भव्य मिरवणुकीसह ग्राम प्रदक्षिणा
विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विजयदुर्ग येथील जुनी बाजारपेठ येथे असलेल्या राममंदिरांमध्ये श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून त्याची सुरुवात रविवार दिनांक २२ तारखेला सायंकाळी ४ वाजता संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून होणार आहे. २३ तारखेला सकाळी आठ ते एक या वेळेत प्रधान संकल्प, पुण्याहवाचन, मुख्य देवता स्थापन, जलाधिवास आणि शय्याधिवास. रात्री १० वाजता देवगड येथील प्रसाद शेवडे यांच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम.
२४ तारखेला सकाळी नऊ ते एक वाजता स्थापित देवता पूजन, वास्तू होम, ग्रह होम, मुख्य पर्याय होम. रात्री ९ वाजता सुस्वर भजनांचा कार्यक्रम (बुवा साची मुळम, हुर्शी) रात्री १० वाजता नाडण येथील जोशी बुवा तसेच रात्री ११ वाजता हुर्शी येथील अजित मुळम बुवा यांची सुश्राव्य भजने. २५ तारखेला सकाळी साडेआठ वाजता कलशारोहण, सकाळी १० वाजता प्राणप्रतिष्ठा, बलिदान आणि पूर्णाहुती. दुपारी १२ वाजता महाआरती आणि रात्री १० वाजता मुंबई येथील प्रसिद्ध गायक महेश सारमंडळी यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम. २६ तारीखेला रामनवमी उत्सव दिन असल्याने सकाळी ११ वाजता कलंदर ग्रुप विजयदुर्ग यांच्या वतीने पालखी सोहळा आयोजित केलेला आहे. याचबरोबर २३, २४ आणि २५ तारखेला रोज दुपारी एक ते तीन वाजता महाप्रसाद आयोजित केलेला आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.












