मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांना कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

सावंतवाडी : राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी कणकवली येथील त्यांच्या ‘ओम गणेश’ निवासस्थानी कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कार्यवाहक ॲड. नकुल पार्सेकर, सल्लागार हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, सदस्य निलेश धडाम आणि असोसिएशनचे कार्यालय प्रमुख आग्नेल फर्नांडिस यांनी नामदार नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी राणे यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.