
राजापूर (वार्ताहर): भारतीय जनता पार्टी चे नेते आणि राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास खात्याचे मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस राजापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
नाम. नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवारी राजापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वात्सल्य मंदिर ओणी येथे अनाथ मुलांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, भाजपा महिला प्रदेश सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, तालुकाध्यक्ष मोहन घुमे, एड. एकनाथ मोंडे यांसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
तर नाम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे भारतीय जनता पार्टी राजापूर यांच्या वतीने रूग्णांना फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, भाजपा महिला प्रदेश सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, तालुकाध्यक्ष मोहन घुमे, एड. एकनाथ मोंडे, अभिजित गुरव, अनिलकुमार करंगुटकर, सौ. सुयोगा जठार, श्रृती ताम्हनकर, अरविंद लांजेकर, शितल पटेल, शितल रहाटे, रेणुका गुंडये, डॉ. मोहनिश शिवदे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थीत होते.
तसेच महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व खार बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी राजापूर शहर यांच्या वतीने शहरातील बंगलवाडी शाळेत सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मोहन घुमे, शहर अध्यक्ष विवेक गुरव, सौ.श्रुती ताम्हनकर,श्रीमती शितल रहाटे, रेणुका गुंडये, सौ. विद्या गुरव, समृद्धी गुरव, साहिल गुरव, शिवम गुरव, सात्विक गुरव, श्लोका गुरव, शिक्षिका अस्मिता लाड, संजय जाधव उपस्थीत होते. आदि उपस्थित होते.











