खेड(प्रतिनिधी) खेड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी उद्योजक मंदार संसारे तर सेक्रेटरीपदी अॅड. मिलिंद जाडकर यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी सुयोग बेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ २९ जून रोजी सायंकाळी ७ वाजता रोटरी स्कूलच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे.
नूतन अध्यक्ष मंदार संसारे सामाजिक, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच अंग्रस्थानी असतात. पंचनदी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात दिला. ते रोटरी स्कूलचे संचालक देखील आहेत. नूतन
सेक्रेटरी अॅड. मिलींद जाडकर वकिलीसह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. खजिनदार सुयोग बेडेकर हे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची मदत मिळवून देत असतात.











