शिवसेना जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी अब्दल्ला तांबे

खेड़(प्रतिनिधी) शिवसेना जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी अब्दल्ला तांबे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भरणे येथील शिवसेना कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
ते भरणे मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आहेत. याप्रसंगी उद्योजक शमीम तांबे, शफी तांबे, जिल्हाध्यक्ष सिकंदर जसनाईक, तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.