व्यावसायिक दिपक चंदुरकर आणि मैत्री फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

लांजा ( प्रतिनिधी) व्यावसायिक दिपक चंदुरकर आणि मैत्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साटवली येथील रा.सि.बेर्डे. माध्यमिक विद्यालय व श्रुतिका यदुनाथ बेर्डे जूनियर कॉलेज साटवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी मैत्री फाऊंडेशनचे सचिव राजन सुर्वे, सदस्य ॲड. ओंकार गांगण, अनिल सुर्वे, सचिन सुर्वे, चिंतामणी सुर्वे, शिवाजी पराडकर, हनुमंत सावंत, अनिकेत सुर्वे उपस्थित होते. यावेळी शालेय ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत जाधव, रा.सी बेर्डे माध्यमिक विद्यालय मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष गोपाळ चंदुरकर, संस्थेचे उपाध्यक्ष नारकर, संस्था सदस्य बरमारे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी
मैत्री फाउंडेशन व दीपक चंदुरकर यांचे कौतुक केले . दीपक चंदुरकर यांनी वह्या आणि १५० स्कूल बॅग शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिल्या. गेल्या वर्षीपासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून दीपक चंदुरकर यांचं शिक्षणासाठी खूप मोलाचं काम आहे. साटवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेला दरवर्षी काही ना काही वस्तू रुपी मदत ते करत असल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच ते व त्यांची मैत्री फाउंडेशन संस्था करीत असलेल्या भरीव योगदानाबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले.
यावेळी मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश डांगे,
उपाध्यक्ष दीपक पराडकर,सचिव राजन सुर्वे ,उप सचिव संदीप बापेरकर, खजिनदार किसन जोंधळे ,
उप खजिनदार समीर सुर्वे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक भालेकर यांनी केले तर मैत्री फाउंडेशन संस्थेच्या वतीने आभार कदम यांनी मानले












