कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी स्वीकारला पदभार

कणकवली : कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची मालवण पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. त्यामुळे कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी बुधवारी सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याकडून स्वीकारला आहे. जिल्हा मुख्यालय येथून पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची कणकवली पोलीस निरीक्षक पदी बदली झाली. बुधवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तर पोलीस निरीक्षक मारुती जगताप याना मालवण पोलीस निरीक्षक पदी बदली झाल्याबद्दल कणकवली पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कणकवली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.