राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे सायन्स क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेला ‘माइंडमेझ २०२६’ हा दोन दिवसीय उपक्रम दि. २६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय विज्ञान दिन हा भारताचे महान शास्त्रज्ञ, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लावलेल्या ‘ रामन परिणाम’ (Raman Effect) या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
रामन परिणाम म्हणजे प्रकाश किरण एखाद्या पारदर्शक माध्यमातून जाताना त्याच्या तरंगलांबीमध्ये होणारा सूक्ष्म बदल होय. या शोधामुळे पदार्थांच्या रचनेचा अभ्यास करण्यास मोठी मदत झाली. या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
त्याच प्रेरणेने या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ विचारसरणी विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत रिसर्च पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, इव्होल्युशन स्पर्धा, क्विझ स्पर्धा तसेच रुबिक्स क्यूब सॉल्व्हिंग स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वी तसेच अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष (FE) आणि द्वितीय वर्ष (SE) विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, विश्लेषणात्मक विचारसरणी आणि तांत्रिक कौशल्ये प्रभावीपणे उजागर झाली.

स्पर्धांचे तपशील व निकाल
🔹 पोस्टर प्रेझेंटेशन
परीक्षक : प्रा. एस. एस. नलावडे व प्रा. एस. पी. कदम
इव्हेंट समन्वयक : कु. सानिका नलावडे
🥇 १ ला क्रमांक : पूर्वा देवानंद इसवलकर व आश्रिया अॅलेक्स फर्नांडिस
🥈 २ रा क्रमांक : पूर्वा राजेश माटवकर व सुहानी सखाराम केरकर
🥉 ३ रा क्रमांक : आदित्य राजेंद्र कांबळे व श्रेयस श्रीकांत खाडे
🔹 प्रोजेक्ट प्रेझेंटेशन स्पर्धा:
परीक्षक : प्रा. डॉ. एस. एस. कुलकर्णी व प्रा. सुयोग सावंत
इव्हेंट समन्वयक : कु. प्राची कदम
🥇 १ ला क्रमांक : रोहित नाईक, प्रोजेक्टचे नाव_1)ग्रामपंचायत डिजिटल पोर्टल
🥈 २ रा क्रमांक : श्रेयस श्रीकांत खाडे व सौरभ सिद्धार्थ जाधव
प्रोजेक्टचे नाव_कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली
🥉 ३ रा क्रमांक : सौरभ संदीप शिंदे व दुर्वेश निलेश पवार प्रोजेक्टचे नाव_एआय साईन लँग्वेज ट्रान्सलेटर
🔹 क्विझ स्पर्धा
परीक्षक : प्रा. ए. एस. पेंडसे
इव्हेंट समन्वयक : कु. जिगीशा म्हापसेकर
🥇 १ ला क्रमांक : साहिल विश्वास जाधव व तुषार संतोष निथाळे.
🥈 २ रा क्रमांक : विठ्ठल शेषराव पांडीलवाड व यश रोहिदास मेस्त्री
🥉 ३ रा क्रमांक : अपूर्वा अनिल वर्दम व रुची मनोज गुरव
🔹 इव्होल्युशन स्पर्धा
परीक्षक : प्रा. एस. पी. कदम, डॉ. एम. के. साटम व डॉ. ए. पी. पाटील
इव्हेंट समन्वयक : कु. कामाक्षी केळूसकर
🥇 १ ला क्रमांक : सुहानी सखाराम केरकर व अपेक्षा अशोक कांदळगावकर
🥈 २ रा क्रमांक : तन्मय संतोष राणे व प्रथमेश शिवराम शिंदे
🥉 ३ रा क्रमांक : ऋतुजा रामकृष्ण चव्हाण व तन्वी प्रदीप मोरोजकर
इव्होल्यूशन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या ग्रुपने ‘AI for Viksit Bharat’ या डोमेनमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केले. विकसित भारताच्या दृष्टीकोनातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या विविध अनुप्रयोगांवर प्रकाश टाकला गेला, जसे की शिक्षण, आरोग्य, शेती आणि पर्यावरण संरक्षणात AI चा वापर. IEEE फॉरमॅटमध्ये तयार केलेल्या छोट्या संशोधन पेपरमध्ये AI च्या माध्यमातून भारताच्या विकासात्मक ध्येयांचे उदाहरणे, डेटा विश्लेषण आणि भविष्यातील संधी यांचा समावेश होता. स्पर्धेच्या मूल्यमापन समितीने पेपरची रचना, सामग्रीची खोली आणि प्रस्तुतीकरणाची स्पष्टता याबद्दल उच्च मूल्यांकन केले.
🔹 रुबिक्स क्यूब स्पर्धा .
इव्हेंट समन्वयक : कु. समृद्धी गावडे
🥇 १ ला क्रमांक : सिद्धेश संजय डिचोलकर
🥈 २ रा क्रमांक : वैभव मनोहर हरमळकर
🥉 ३ रा क्रमांक : जयेश रमेश जाधव
🔹 ट्रेझर हंट
प्रथम क्रमांक विजेते :
प्रणव वाघमारे, आयुष रंगारी, यश गावडे, यश सावंत
द्वितीय क्रमांक विजेते :
आदेश चव्हाण, स्वरा सांडव, सिताराम रासम, आर्यन सावंत
कार्यक्रमादरम्यान विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व पदक प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. मनीषा पाटील एस एम हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुण्या प्रा. मनीषा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रमुख पाहुण्या प्रा मनिषा पाटील, प्राचार्य डॉ. डी एस बाडकर, प्रा कुडतरकर ए व्ही, प्रा. पी एस राणे , सायन्स क्लब विद्यार्थी अध्यक्ष कु भार्गवी कवटकर आदी उपस्थित होते
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
“विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आणाव्यात. आपल्या महाविद्यालयाचे व्यवस्थापन अशा उपक्रमांना व त्यांच्या कल्पनांना संपूर्ण सहकार्य करत आले आहे व पुढेही तसेच सहकार्य राहील,” असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी सांगितले.
हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सायन्स क्लब समन्वयक ,डॉ. शुभांगी माने यांच्या मार्गदर्शनाखाली, सायन्स क्लबच्या विद्यार्थी अध्यक्ष भार्गवी कवटकर, उपाध्यक्ष प्राची कदम, सचिव जिगीशा म्हापसेकर तसेच कामाक्षी केळूसकर व प्रथम वर्ष विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे, अध्यक्षा सौ. नीलम राणे, उपाध्यक्ष आमदार निलेश राणे तसेच सचिव व मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री मा.नितेश राणे यांनी आयोजकांचे कौतुक केले .
या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील व नजिकच्या ज्युनिअर महाविद्यालयातील मिळून २८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
एकूणच ‘माइंडमेझ २०२६’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरला.
या कार्यकमासाठी चे सूत्रसंचालन कु .फाल्गुणी लिंगायत व कु मंदार राणे यांनी केले. आयोजकांनी सर्व सहभागी व उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.











