देशाला उंचीवर नेण्याचे काम मोदीजींनी केले
कर्तुत्ववान पंतप्रधान लाभले याचा सार्थ अभिमान
वैभववाडी – कोल्हापूर हा रेल्वे मार्ग व्यापार उद्योगाला आणखी चालना देईल
वैभववाडीत व्यापारी मेळावा संपन्न
वैभववाडी | नरेंद्र कोलते : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश हीताचे अनेक प्रकल्प राबवले आहेत. मागील नऊ वर्षात देशाला उंचीवर नेण्याचे काम मोदींनी केले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून वैभववाडी – कोल्हापूर हा रेल्वे मार्ग लवकरच सुरू होईल. व्यापार, उद्योगासाठी हा रेल्वे मार्ग निश्चितच महत्वाची भुमिका बजावेल. देशाला कर्तुत्ववान पंतप्रधान लाभला याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. विकास प्रक्रियेला आणखी गती देण्यासाठी मोदीजींचे हात अधिक बळकट करुया, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
वैभववाडी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्यापारी मेळावा येथील महाराणा प्रतापसिंह कलादालनात पार पडला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, प्रमोद रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, नगराध्यक्षा नेहा माईंणकर, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, हुसेन लांजेकर, संजय लोके, सुधीर नकाशे, विजय तावडे, सर्व नगरसेवक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, 2014 पूर्वी देश कुठे होता. याचे प्रत्येकाने आत्मचिंतन करा. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताचे नाव अग्रक्रमाने घेते घेतले जाते. त्याचे सर्व श्रेय मोदी साहेबांना आहे. गावागावात रस्त्याचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गगनबावडा – वैभववाडी या मार्गाला सरकारच्या माध्यमातून अडीचशे कोटीचा निधी देण्यात आला आहे. हा रस्ता निर्धोक झाल्यास व्यापाऱ्यांनाच याचा फायदा होईल. व्यवसायात कॅशलेस पद्धती आज फायदेशीर ठरत आहे. याचा फायदा व्यापाऱ्यांनाही होत आहे. कोरोनात गरीब गरजूंना धान्य देण्याचे काम मोदींनीच केले आहे. कोरोनात ठाकरे सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले. मात्र मोदींनी सर्वांना तारले. कोरोनाची लस देखील केंद्र सरकारने उपलब्ध केली. खरा आधार, कुटुंब उभी करण्याचे काम मोदींनी केले. अभिमान वाटावा असा पंतप्रधान आपल्याला लाभला आहे. याचा सार्थ अभिमान वाटला पाहीजे. 2024 मध्ये निवडणूक होत आहे. मोदींनी केलेले काम तळागाळात पोचवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे असे सांगितले. व्यापारी मंगेश गुरव, तेजस साळुंखे, संजय लोके, श्री ताम्हणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले विविध उपक्रम याचे चित्रीकरण याप्रसंगी दाखवण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र पाताडे यांनी केले तर आभार सुधीर नकाशे यांनी मानले.












