दोन जण जखमी, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली: प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील गोरिवलेवाडी, कोंढे येथे कुत्र्याने घराशेजारी घाण केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत दोन जण जखमी झाले असून परस्पर तक्रारीनंतर एकूण सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना 24 जून 2025 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, महादेव जानू रेवाळे (रा. गोरिवलेवाडी, कोंढे) यांच्या कुत्र्याने रुपेश वसंत गावडे यांच्या घराशेजारी घाण केली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला वाद शाब्दिक झटापटीपर्यंत मर्यादित होता. मात्र काही क्षणांतच शिवीगाळ, दमदाटी झाली आणि प्रकरणाने उग्र रूप घेत हाणामारी झाली.
या झटापटीत रुपेश गावडे आणि महादेव रेवाळे हे दोघे जखमी झाले आहेत.
घटनेनंतर दोन्ही पक्षांनी दापोली पोलीस स्थानकात परस्पर तक्रारी दिल्या. रुपेश गावडे यांच्या तक्रारीवरून महादेव रेवाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तर महादेव रेवाळे यांच्या तक्रारीवरून खालील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश वसंत गावडे, विठ्ठल बाबू राजीवले, जयवंत पांडुरंग राजवले,अनुराग जयवंत राजवले, दिलीप दशरथ करजकर यांचा समावेश आहे.
दोनही बाजूंनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.












