फोंडाघाट विकास सेवा सोसायटी आणि ग्रामपंचायत कडून संतोष सावंत यांचा सत्कार संपन्न !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात तलाठी संतोषभाऊंनी कुणालाही तक्रार करण्याची संधी न देता, प्रामाणिकपणे महसूल सारख्या महत्त्वाच्या विभागाचा कारभार पारदर्शक ठेवला,असे गौरवपर उद्गार उपसरपंच सौ.तन्वी मोदी यांनी काढले.ग्रामपंचायत फोंडाघाट आणि फोंडाघाट विकास सेवा सोसायटी तर्फे सरपंच सौ.संजना आग्रे आणि सोसायटीचे चेअरमन राजन नानचे यांचे हस्ते तलाठी संतोष सावंत यांचा उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवा काळातील मार्गदर्शक, स्मितभाषी आणि मार्गदर्शक तरीही, पक्षकारांच्या कामाचा त्वरित निपटारा करण्याच्या कामकाजाचे कौतुक करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
आजवर केलेल्या प्रामाणिक कामाची पोच पावती फोंडावासीयांनी या सत्कारातून दिली, याबद्दल मी सदैव ऋणी राहीन.अशी ग्वाही सत्काराला उत्तर देताना फोंडाघाट तलाठी संतोष सावंत यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायतीमध्ये सुभाष सावंत, स्नेहलता पांचाळ, मिलिंद लाड, प्राची धुरी,जयेश भोगले, पवन भालेकर, अनिल लाड, समीर सावंत ,मनीषा चव्हाण, राजेश्वरी जोईल,पोलीस पाटील सुधीर तेली आणि सोसायटी कार्यालयांमध्ये चेअरमन राजन नानचे,ध्रुवबाळ गोसावी, प्रसाद देसाई,अशोक तावडे, मेस्त्री, आणि ग्राहक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन सरपंच सौ. संजना आग्रे यांनी करताना त्यांना शुभेच्छा दिल्या…..












