वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील साखर गावचे सुपुत्र मनोहर धनावडे हे मुंबई पोलीस दलातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना दुसऱ्यांदा जाहीर झालेल्या राष्ट्रपती पुरस्काराचा अलंकारण समारंभ गुरुवार दि.२६ जून रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन (मुंबई) येथे संपन्न झाला. सदर पुरस्कार हा दादांच्या पोलिस दलातील एकंदरीत कामगिरीचे मूल्यमापन करून देण्यात आला आहे.
यापूर्वीही पोलिस दलातील विषेश कामगिरी बद्दल दिनांक १६ जानेवारी २०१८ रोजी तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते व तत्कालीन गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य दीपक केसरकर यांचे उपस्थित त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मनोहर दादांच्या घराण्याला देशसेवेचा मोठा वारसा असून त्यांचे दिवंगत वडील दगडू धनावडे हे मुंबई पोलिस दलातून सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावरून निवृत्त होते. तसेच त्याचे दोन्ही चुलते व एक भाऊ भारतीय लष्करातून निवृत्त आहेत. त्यांच्या या गौरवास्पद कार्याने साखरगाव बरोबरच खेड तालुक्याचे नावलौकिक वृद्धींगत झाले असुन, त्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फोटो फाईल- सीपीएन२७-४