आणीबाणी काळात तुरुंगवास सोसलेल्या नागरिकांचा चिपळूण भाजपातर्फे कृतज्ञतापूर्वक सन्मान

चिपळूण (प्रतिनिधी) : दि. २५ जून १९७५ रोजीच्या मध्यरात्री देशात आणीबाणी आणली गेली. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेने भारतीयांना दिलेल्या मूलभूत व्यक्तिस्वातंत्र्याला तिलांजली देऊन हुकुमशाही आणली गेली होती. या २१ महिन्याच्या अंधारकाळात देशातील अनेक नागरिकांनी प्रखर लढा दिला होता. २१ महिन्यांनी देशातील जनता पेटून उठली आणि देशावर लादलेली हुकूमशाही उलथवून टाकली. आणीबाणीच्या या घटनेला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आणीबाणी काळात ज्या ज्या व्यक्तींनी संघर्ष केला, तुरुंगवास सोसला अशा व्यक्तींच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता भारतीय जनता पार्टी चिपळूणच्या वतीने लोकतंत्र लढ्याचे स्मरण या कार्यक्रमाचे आयोजन आज चिपळूण येथे करण्यात आले होते. यावेळी आणीबाणी काळातील संघर्षामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचा व जे आता दिवंगत झाले आहेत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.विनय नातू उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी तर सुत्रसंचलन सौ. सारिका भावे यांनी केले. यावेळी प्रकाश देशपांडे, बापू काणे, सुरेश साठे, साईनाथ कपडेकर, इदाते सर, सुनील खेडेकर, श्री.आंबेटकर व अन्य काही ज्येष्ठ व्यक्तींनी आणीबाणी काळातील आपले विविध अनुभव सर्वांसमोर मांडले. आणीबाणी काळात या व्यक्तींनी केलेला संघर्ष, त्यांनी सोसलेला तुरुंगवास यामुळे आज आपण व्यक्तीस्वातंत्र्य जीवन जगत आहोत असे मत यावेळी भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार विनय नातू यांनी आपल्या मनोगतामध्ये आणीबाणी काळातील संघर्ष केलेल्या तुरुंगवास असलेल्या व्यक्तींना शासनाच्या माध्यमातून पेन्शन मिळण्याकरिता केलेला पाठपुरावा आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कृतीतून दाखविलेला सकारात्मक प्रतिसाद याबद्दलचा अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, भाजपा चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद भुरण, स्नेहा मेस्त्री,माजी नगरसेवक विजय चितळे, माजी नगरसेवक आशिष खातू, रसिका देवळेकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा शितल रानडे,जया केतकर, पूनम काजारी, दीपा देवळेकर,अमित चिपळूणकर, निनाद आवटे, मधुकर निमकर,अनिल सावर्डेकर, संदेश ओक,अभय चितळे, वैशाली निमकर, जतिन घटे,अभिषेक राजापूरकर तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो फाईल- सीपीएन२७-२