वेतोरे हायस्कूलचा विद्यार्थी साईराज सामंत याचे जिल्हास्तरीय बँडमिंटन स्पर्धेत दैदिप्यमान यश..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :कुडाळ येथे संपन्न झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन सिंधुदुर्ग कुडाळ आयोजित निवड चाचणी तथा अजिंक्य स्पर्धा २०२५ या स्पर्धेत वेतोरे हायस्कूल चा विद्यार्थी कु. साईराज विनय सामंत या विद्यार्थ्यांने १७ वर्षाखालील गटांमध्ये अजिंक्यपद तसेच खुल्या गटांमध्ये सुद्धा अजिंक्यपद मिळविले.

या स्पर्धेची पुढची फेरी सातारा येथे होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. बेंगलोर येथे होणा-या आँल इंडिया बँडमिंटन असोशिएशन च्या वैयक्तिक बँडमिंटन स्पर्धेत तो आता भाग घेणार आहे. अथक परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या उज्वल यशाबद्दल त्याचे आणि त्याच्या आई वडिलांचे शिक्षण प्रसारक समिती वेतोरेचे कार्याध्यक्ष श्री. दिगंबर नाईक, उपकार्याध्यक्ष श्री.सुर्याजी नाईक, कार्यवाह श्री.प्रभाकर नाईक सर, सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री.संजय परब सर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.